STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

वृक्ष

वृक्ष

1 min
232

एक झाड लावू मित्रा

त्याला पाणी घालू

त्याला पाणी घालू मित्रा

खत घालून वाढवू

खत घालून वाढवू मित्रा

त्याची निगा राखू

त्याची निगा राखू मित्रा

त्याच्या सावलीत खेळू

त्याच्या सावलीत खेळू मित्रा

त्याची फळ चाखू

त्याची फळ चाखू मित्रा

त्याच्या बिया जपून ठेवू

त्या बियांची परत आपण

वृक्षलागवड करू मित्रा

वृक्षलागवड करू......

पर्यावरणाला हातभार लावू

पर्यावरणाला हातभार लावू मित्रा

आनंदाने सर्व मिळूनी वृक्षसंवर्धन करू .....


साहित्याला गुण द्या
लॉग इन