वरदान सृष्टीला निसर्गाचं
वरदान सृष्टीला निसर्गाचं
1 min
365
निसर्ग माता, पिता ,बंधू निसर्ग देतो अनुभवातून ज्ञान!
फुलांना गंध ,रंग-रूप,आकार मानवास सौंदर्य वरदान!१
निसर्गातील बदल ऋंतुचक्र सांगतो सुख दु:खाचे येणे जाणे!
जन्म-मृत्यु,जिवन चक्र अटळ दाखवतो शिशिर गलितगात्र पाने!!२
निसर्ग सृष्टीला आधार खरा परी जादूगार आहे मोठा!
योग्य संतुलन निसर्गाचं राखता नाही आनंदास तोटा!!३
जंगलतोड,प्रदूषणामुळे निसर्ग भयंकर कोपतो आहे!
अतिवृष्टी,अनावृष्टी ,वादळांसवे सूर्य प्रचंड तापतो आहे!!४
