STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Others

वंजारी गीत

वंजारी गीत

1 min
26.6K



वंजारी शब्द भिडलाय माझ्या हृदयाला

जन्माला आलो वंजारी आनंद मनाला

समाज आपुला भाग्यवंत, शूर आणि गुणवंत

एकत्र पाहून उर भरून येतोय जीवाला

वंजारी म्हणून स्फूर्ती येते रक्ताला

जरी जाल तुम्ही उच्च पदाला, विसरू नका रे समाज बांधवाला

सत्कारणी हात लागू दया मदतीला

सर्वांगीण विकास आपुला करण्याला

भूलू नका रे मानापानाला, द्वेषभावना लोभी पदाला

विचार असू दया समाज एकत्र करण्याला

एकता असू दया महान कार्य करण्याला

विखुरलेले पाहताना तुम्हाला दुःख होते रे समाज मनाला

समाज कार्याने अर्थ येईल जीवनाला, जन्माला यावे ऋण फेडण्याला

कुळ दैवतांचे सांगण तुम्हाला वैर भाव नको आपसात कुणाला

एकत्र यारे हित साधन्याला दुरावलेले मन जुळन्याला

कवी-संजय रघुनाथ सोनवणे.


प्लॉट नं-२/३बी-कृष्णा बिल्डिंग. एनएनपी, गोरेगांव ईस्ट मुंबई.६५


Rate this content
Log in