STORYMIRROR

उत्तम गांवकर

Others

2  

उत्तम गांवकर

Others

वनिताराणी

वनिताराणी

1 min
63

आसमंत हिरवा झाला 

झाली प्रसन्न वनिताराणी

फुले_फळे रंगीबेरंगी खळ

फांदी_फांदी नि पानो_पानी

हा निसर्ग आनंदाने

उधळून लावी रंग

मोत्याच्या दवबिंदूने

आसमंत झाला चिंब 

या निसर्गराजा संगे

होळी खेळे वनिता

तुडुंब भरूनी वाहे

खळ _खळणारी

निर्मल सरीता

आकाशि उडाली दूर

सुंदर पक्षाची माळं 

पिंपळ पाने आनंदे

वाजवती मंजूळ टाळं


साहित्याला गुण द्या
लॉग इन