वंदनीय सैनिकां
वंदनीय सैनिकां
1 min
235
शौर्य रक्तात तुझ्या
वीरश्री संचारते
दुस्मनाच्या वस्तीत
धडकी भरवते ||१||
त्यागाचे महिमान
शक्ती रूपी देवत्व
बलिदान साहसी
स्वाभिमानी कर्तृत्व ||२||
ध्वज तिरंगा उंच
प्रेरणा नवी देतो
पराक्रमी योध्याची
कथा जगा सांगतो ||३||
संकटात धावतो
रक्षीण्या मानवता
दुश्मनाला भिडतो
वाचविण्या भूमाता ||४||
नमवितो मी माथा
" वंदनीय सैनिकां "
अभिमानी विरता
" भारतीय सैनिकां " ||५||