STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Others

वळवाचा पाऊस

वळवाचा पाऊस

1 min
1.3K



सोसाट्याचा वारा सुटला

काळे ढग नभी आले

विजांचा कडकडाट कडाडला

पाऊस धरतीवर पडला


घराचे छप्पर उडाले

निवारा जलमय झाला

बाया माणसांची धावपळ

जीव घराकडे लागला


रान सारे बहरले

पाऊसाच्या सुंदर सरीने

पाणी अंगणी साचले

घेतला आनंद गावाने


शिळ्या भाकरीची चव

लागे पोटाला चवदार

घरी असे विश्व दारिद्रय

समाधानी होता परिवार


मधुनच वीज गायब होई

दिव्याचा प्रकाश घरभर

कधी मेणबत्ती, कधी घासलेटचा दिवा

अभ्यास करी रात्रभर


नव्हत्या तेव्हढ्या सोई

तरी सारे सुखी होते

आता सर्व काही मिळते

तरी निराशाचे डोंगर दिसते


Rate this content
Log in