वळीव पाऊस
वळीव पाऊस
1 min
291
मे महिना बच्चे कंपनीचा आवडीचा
सुट्टीचा मनमुराद खेळण्याचा,
बागडण्याचा, भावंडाशी भांडण्याचा
भरपूर खेळून,घामेघूम होऊन
लाहीलाही होऊन घामोळे झालेला
त्यातच आकाश काळवंडले
ढगात गडगडला वीजेचा चित्कार
कडकडाट वारा, वादळ, बेभान होऊन
सैरावैरा झाडावर, घरावर आपटू लागले
झाडावरच्या कैऱ्या-चिंचा खाली पडल्या
पावसाचे टपोरे थेंब, गारा, टप-टप पडू लागल्या
मुले सरसावली अंगणात
परसात येवून गारा वेचून खावू लागली
पहिल्या पावसाचा आनंद घेवून
नाचू - बागडू लागली
