विविध रंगाची होळी
विविध रंगाची होळी
1 min
250
विविध रंगाची होळी
आली आली बघा हो होळी
खाऊ चला पुरणाची पोळी
अवगुण सारे दहन करून
करु या त्याची राखरांगोळी
आज होळीचे करून पूजन
देऊ पुरणपोळीचा नेवैद्य
खायला कुणा कमी न पडो
मिळत राहो गोडगोड खाद्य
फाल्गुन महिन्याचा गोल चंद्र
आकाशी दिसतो कसा शुभ्र
वसंत ऋतूला होते प्रारंभ
हवामान असे कोरडे निरभ्र
होळीच्या दुसऱ्या दिवशी
असतो विविध रंगाचा खेळ
वेगळ्या रंगात विभागलेल्या
लोकांना एकत्र येण्याची वेळ
लाल पिवळा निळा हिरवा
रंगाने एकमेकांना रंगू या
एकमेकांच्या सुखदुःखात
एकत्रित साजरी करू या
पाण्याचा अपव्यय टाळा
अंडे फेकून मारू नका
कोरड्या रंगाने होळी खेळा
रंगपंचमी बेरंग करू नका
