विठू माउली
विठू माउली

1 min

18
आषाढी ही आली
पावसात न्हाली
पंढरी ही ओली
भक्तीची ही खोली
नामाचा गजर
भक्तीचा जागर
लोटतो सागर
पंढरी आगार
विठ्ठल माउली
भक्तांची सावली
जगास दावली
भक्तांची माउली
विठू ठायी ठायी
वारकरी गायी
दर्शनास जायी
अनवाणी पायी
विठू वेड लावी
वेडा भक्त धावी
देवा भेट द्यावी
यावे माझ्या गावी
अनवाणी भक्ती
ओठी नाम शक्ती
तुझे भक्त गाती
देवा तुझी ख्याती
देव विटेवरी
सावळा गाभारी
हात कटेवरी
रूप तझे हरी
वेडावतो मज
चंदनाचा साज
मंजिरीची गाज
भेट द्यावी आज