विठ्ठला पांडुरंगा तु
विठ्ठला पांडुरंगा तु
1 min
205
सावली तु देवा
सगळ्या मनाची
दे ठावं मतिला
शुद्ध अंतरीचे
आधार तु विश्वासाचा
मनी देतोस रे बळ
मायेची ऊबदार माऊली
असाह्यचा दिवा तु
विठ्ठला पांडुरंगा
मन शांतीचा वसा तु
आलो आज तुज भेटीला
धन्य झालो धन्य देवा
ह्र्द्यात सदा रूप तुझे
पाहतो मी लोचनीं देवा
भक्ती भावाचा ओढा हा
असाच निरंतर वाहूदे
विठ्ठला पांडुरंगा तु.....
लेंकरुवाळा मायबापा
असुदे तुझे आशीर्वाद
भोळ्या भाविक भक्तांवरी
विठ्ठला पांडुरंगा तु....
