विषयांतर
विषयांतर
1 min
157
कधी अंतर विषयांमधले
तोडते दरी बनुनी
कधी विषयांना सांधणारे
जोडणारा पूल होऊनी .....विषयांतर..
रसाळ वाणीने सांगती
विषय तो समजावूनी
भरकटता त्या विषयातूनी
रटाळ ती वाणी.........विषयांतर...
गप्पांची सुरू मैफल
सुखद त्या आठवणी
अचानक तिथे उकरूनी
कुणी काढती उणीदुणी.....विषयांतर...
नसतीच ती वादावादी
जणू काही आणीबाणी
नूर बदलून तयाचा
करी कुणी हास्यफवारणी.......विषयांतर....
दुभंगतात कधी मने
ना केले कुणी जाणूनी
सांधावी भेग ती
झाले गेले विसरुनी.......विषयांतर.....
