Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Others

3  

Neha Ranalkar

Others

विषय: व्यथा महिलांच्या

विषय: व्यथा महिलांच्या

1 min
303


महिला महिला म्हणून ठरविती अबला |

कधी सबला म्हणूनी देती मान पहिला | |१| |


अबला की सबला सत्य काय आहे ?

जाणून बुजून केलेली ही धूळफेक आहे | |२| |


कधी आई म्हणूनी मखरात बसवतात |

प्रेयसी कधी म्हणूनी ह्रुदयासी धरतात | |३| |


कधी स्रीत्व लुटून भोगदासी समजतात |

काटेरी देऊन मुकुट वर तलवार टांगतात | |४| |


काय असावे हे आमचे प्राक्तन

ज्यांना देतो आम्ही नवजीवन |

तेच देती जीवंतपणी मरण

नको वृथा ते आम्हा देवपण | |५| |


स्रीवीणा पुरूषांचे अपूर्ण जीवन

स्रीच देई सर्व पुरुषांस जीवन |

उगाच दाविता पुरुषी अहंपण

महिलेच्या नशिबी सदाच वणवण | |६| |


गात्रे अशक्त तरीही शिरी ओझे ते मणमण |

घरासाठी झिजविती शरीराचा कण नि कण | |७| |


जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्री आजही सुरक्षित नाही तिच्यावरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. तेव्हा त्या भावनांना या कवितेतून वाट करून दिली आहे. !


Rate this content
Log in