विषय:- संत गाडगेबाबांचे संकिर्
विषय:- संत गाडगेबाबांचे संकिर्
संत गाडगेबाबांचे संकिर्तन
हाती एका घेऊन खराटा |
अज्ञानाच्या झाडी पाय वाटा | |१| |
अंधविश्वास सारेच दूर लोटा |
घेऊन गाडगं पाण्याचा लोटा | |२| |
धर्मासाठी बळी तो काय म्हणून?
माणुसकी जपा माणूस म्हणून| | |३| |
धगड धोंड्यात का रे देव पाही?
आई वडीलांतच खरा देव राही | |४| |
जिवनबागही शिक्षणाने फुलव |
वस्रहिनांना शक्य ती वस्रे पुरव | |५| |
का जन्मला आहेस कर विचार |
दीन दुबळ्यांचा तू कर स्विकार | |६| |
घेऊन खरा स्वच्छतेचा वसा |
संकिर्तनातून प्रकटे दूत जसा | |७| |
संत गाडगेबाबांचे विचार कण |
समाजसुधारक ज्या म्हणे जन | |८| |
संत गाडगेबाबांचे विचार कण या कवितेतून व्यक्त केले आहे. स्वच्छता करतांना मनाचीही मशागत ते करत.
