STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

3  

Neha Ranalkar(Nawate)

Others

विषय: निराशा

विषय: निराशा

1 min
263

एकाकी निराश जगी

लाभेल अर्थ कसा?

स्वार्थ या जगात मज

देईल कोण दिलासा?१


दु:ख ज्याचे त्याने

भोगतच का रहावे?

पाहून एकास रडतांना

दुसऱ्यास हसू का यावे?२


किती दिवस आसवांना

सोबतीस ते घ्यावे?

सृष्टीसाठी या पावसाने 

किती तरी बरसावे?३


अपमानाच्या जखमांवर

मीठच सर्वांनी चोळले|

सत्याच्या निखा-यात

मीच मला जाळले||४


आशेच्या किरणांची

पाहू किती मी वाट?

अंधारलेल्या जीवनी

उगवेल कधी पहाट?५



Rate this content
Log in