STORYMIRROR

Bharati Sawant

Others

3  

Bharati Sawant

Others

विषय- माझा छंद

विषय- माझा छंद

1 min
248

 आवडतो नाद मज साहित्याचा

 आता लागला हा छंद लिहिण्याचा


 ज्ञानार्जन झाले मज लेखणीने

 व्याप्ती साहित्याची वाढविले तिने


 चैन पडेना मजला तिजविना

 खाली ठेवण्यास पेन धजविना

 

 कितीतरी लेख कथा नि कविता

 झाल्या लिहूनच संग्रहाकरिता


 शोधतेय मार्ग त्या प्रकाशकाचा

 छापणार संग्रह काव्य कथांचा


 करू विचार छानशा चारोळ्यांचा

 नको विचार फुकाच्या आरोळ्यांचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन