STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

3  

Neha Ranalkar(Nawate)

Others

*विषय:-लाडकी लेक*

*विषय:-लाडकी लेक*

1 min
439

लक्ष्मीच्या सोन पावलांनी

लाडकी लेक आली घरी |

दारी तोरण, सडा शिंपून

रांगोळी रेखली त्यावरी | |१


तिचे तुरुतुरु धावणे वाटे

ऐकावेसे गोड बोबडे बोल |

हास्य गालावरचे पाडते विसर

दु:खाला काळजातल्या खोल | |२


व्यथा माहेरची, ममता, प्रेम

लेकीला असते फक्त कळत |

जरा दुखलं खुपल कुणाला तरी

आधी ती जाई माहेरी पळत | |३| |


तिच्या सासरी जाण्याने माहेर

होते खरे रिक्त अन् सुने सुने |

परक्याचे धन म्हणतो तरीही

ऋणानुबंध जपते सदा जूने | |४| |


Rate this content
Log in