विषय: कुहूकुहू
विषय: कुहूकुहू
1 min
393
कुहूकुहू साद घाली
कोकीळेला तो कोकीळ
आम्रवृक्ष बहरता
स्वरातून निघे शीळ
मंजूळ स्वर ऐकून
आनंदीत होते मन
आंब्याला येतो मोहोर
स्वागतार्ह ते गायन
किती गोड त्याचा गळा
दैवी देणगीच जणू
कुहूकुहू साद देता
पुन्हा तो ही लागे म्हणू
काळ्या रंगावर मात
त्याचे गायनच करे
कावळा कोकीळ भेद
नजरेत स्वर भरे
कुहूकुहू गात रहा
कौतुके जगा एेकू दे
मोद जगास देऊनी
माधुर्याचा स्वर साज
गोडी आंब्यात ठेऊनी
