विषय: - कोकिळेचे कुहू कुहू
विषय: - कोकिळेचे कुहू कुहू
1 min
11.7K
रानी वनी येई कानी
कोकिळेचे कुहू कुहू |
ऋतुराज ये वसंत
मोहरला आंबा बहू | |१| |
गोड वाटे स्वर मज
ऐकताच लागे ध्यास |
होऊ नये बंद कधी
चालू राहो स्वराभ्यास | |२| |
शिकवणी वर्ग तुझा
मज लावता येईल? |
तान स्वर्गीय गळ्यात
मला धरता येईल? | |३| |
कंठ तुझा का बसेना
वाटे मज नवलाई |
स्वर्ग सुधारस तुज
कोण भरवते बाई? | |४| |
आसमंत निनादतो
स्वर ऐकून मंजुळ |
तळमळ वाढलीय
जीव तुटे तीळतीळ | |५|
