STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

4  

Neha Ranalkar(Nawate)

Others

विषय: गुंतता हृदय हे

विषय: गुंतता हृदय हे

1 min
465

गुंतता हृदय हे

सख्या मलाच राहात नाही

माझे भान

ऐकत आहे जरी वाटत असले

माझ कान||१


गुंतता हृदय हे

मी होते सैरभैर

डोळे मिटून घेतले तरी

नजर नसते स्थिर||२


गुंतता हृदय हे

कशातच लागत नाही मन

आजूबाजूच्या घटनांचा

दुर्लक्षित होतो प्रत्येक क्षण||३


गुंतता हृदय हे

झोपच जाते उडून

जागेपणी पडतात स्वप्न

राहतो आपण पडून||४


Rate this content
Log in