STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

3  

Neha Ranalkar(Nawate)

Others

*विषय:- देवघर/देव्हारा*

*विषय:- देवघर/देव्हारा*

1 min
156

प्रत्येक घराच्या आत

हवेच देवघर एकतरी |

थकल्या मनाला द्यायला

सकारात्मक उर्जा जरातरी | |१| |


देवघरात भलेही नसतील

खूप सारे असंख्य देव |

असावेतच इष्ट देवी, देवता

सढळ श्रद्धा हवीच एकमेव | |२| |


लावावा एक दिपक नित्य

सतत रावा तेवत |

ठेवावी देवतांची जरा स्मृती

असतांना सुखाने जेवत | |३| |


सायंकाळी लावून सांजवात

ओवाळावे निरांजन प्रेमाने |

सुखी ठेव घरातील सा-यांना

करा प्रार्थना त्याची नेमाने | |४| |


देव नसतो पैशाचा भुकेला

त्याला आवडे निरागस भक्ती |

नका पिटवू भक्तीचा डांगोरा

दाखवा समर्पणभाव यथाशक्ती | |५| |


देव्हारा आहे म्हणून येते

सळाळते चैतन्य घरात |

घरातील प्रत्येक स्री असते

समई जणू तेवत देवघरात | | ६| |


देव्हारा वा देवघर असल्या शिवाय घर ते स्वत:चे वा भाड्याने घेतलेलं असलं तरी त्यात फारसं स्वारस्य वाटत नाही. देव्हाऱ्यात असलेल्या इष्ट देवी ,देवता त्यांच्यापुढे तेवणारी समई संध्याकाळी लावलेली सांजवात, केलेली नित्य आराधना त्या घरातील प्रत्येक सदस्याला सकारात्मक उर्जा देत असते. तेव्हा अशा घरातील प्रत्येक स्री हि जणू समई सारखीच तेवत असते म्हटले तर वावगे ठरू नये! हाच भाव या कवितेतून व्यक्त केला आहे.


Rate this content
Log in