विषय:-चक्रव्यूह
विषय:-चक्रव्यूह
तुझ्या प्रेमात पडलेली मी
धावतेय तुझ्या मागे
नकळत रात्रंदिनी
आशाळभूतपणे...
मृगजळामागे धावण्यासारखी.
तु माझ्या सारख्या
कितीकांना नादी
लावलं आहे?
ते मला पक्क ठाऊक आहे
पण...
पण... .मी नाकारुच शकत नाही
तुझं ते अर्थगर्भित सौंदर्य.
मी वेडी झालेय ..
फक्त तूझ्याचसाठी.
माझी अवस्था झालीय
चक्रव्यूहातील असहाय्य
त्या अभिमन्युप्रमाणेच
विलक्षण...
तुझ्यातलं ते आभाळपण
माझ्या शब्दसामर्थ्यांच्या
आवाक्या बाहेरचे..
चक्रव्यूहाचा भेद करुन
सोबत.. सोबत कविवर्य
पदवी आणण्याची,
माझी एवढी...
एवढी एकच मनिषा आहे...
.
