विषय-चित्रकाव्य
विषय-चित्रकाव्य
1 min
190
निळ्या नितळ जलाशयात दिसे
मंदिरासवे निसर्गाची प्रतिबिंबं |
वृक्षलतांसह हिरवे निळसर डोंगर
आकाशात उगवणारे रवीबिंब | |१| |
निळ्या आभाळाच्या प्रभावाने
डोंगर नि जलाशय होती निळे |
सौंदर्य आरस्पानी बघतांनाच
सा-यांची नजर त्यावरी खिळे | |२| |
मंदिराच्या कळसांचे दृश्य दिसे
अधिकच पवित्र नि मनोहारी |
सृष्टीच्या निर्मित्याला स्वप्न पडले
असावे निर्मितीचे विलक्षण भारी | |३| |
दिलेल्या चित्रावरून काव्य रचतांना कलवीच्या कल्पना शक्ती व निरीक्षण शक्तीचा कस लागतो!
