विषय: ब्यूटीपार्लर
विषय: ब्यूटीपार्लर
येता जाता तू ब्यूटी पार्लर
मध्ये जातेस|
कुठले कुठले फेस पॅक तोंडावर
फासत रहातेस||१
जातांना असतेस माझीच तू सुंदर
सखी साजणी साजरी |
पार्लर मध्ये परतलीस की वाटते
पहिलीच होती तू बरी||२
केस होते तुझे आधी लांबलचक काळे अन मऊसूत|
कापलेस, फुलवून मोकळे सोडता
दिसतेस की तू भूत||३
आधी डोळे तुझे दिसायचे मला
तेजाने अनोखे चमकतांना|
वाटतेय बसलीय मांजर काजळ सारित डोळे मिचकवतांना||४
गुलाबी ओठांवर दिसायचं पूर्वी
स्मित हास्य खुलून|
लिपस्टिक पुसायला नको म्हणून
गेलीस हास्य भुलून||५
साधं गुलाबाचं फूल माळलंस तरी
दिसायचे ते तुला शोभून|
आता पूर्ण फुलांच्या गुच्छांत मी थकतोय तुलाच गं शोधून||६
साधं मोग-याच अत्तर सुगंधी
तुझ वेड मला लावायंचं|
परफ्यूमचे त-हेत-हेचे वास आता
निमित्त होतं दूर पळून जायचं||७
साधी काठ पदरी साडी ही तुझं रुप खुलवायची|
पैठण्यांचा खच दाखवी फिटलेली
हौस भुलवायची||८
साधी पावडरही न लावता दिसे पूर्वी मुखडा तुझाच गोरापान|
क्रीमनंच थाटलंय दुकान करून
चेह-याची ओढाताण||९
माझ्या टिचभर पगारात सारं होई
किराण्यासह साज सामान|
आता गलेलठ्ठ पगार माझा निम्मा
तुझ्या ब्यूटीवर चढे परवान||१०
मंगळसुत्राच्या गळसरीचा एकच दागिनाही तुला खूप सुखवायचा|
प्रदर्शन दागिन्यांच भरलेलं असता इतरांचा गूंजभर तुला दुखवायचा?११
ब्यूटी पार्लर ही चैनीसाठी नसून अत्यावश्यक असा समज करून घेतला जातो तेव्हा त्याला एक विडंबन कविता लिहिली आहे
