STORYMIRROR

Bharati Sawant

Others

2  

Bharati Sawant

Others

विषय - भारत माझा देश आहे

विषय - भारत माझा देश आहे

1 min
178

भारत माझा देश आहे नि

सारे भारतीय माझे बांधव

कोरोना विषाणूने घेरलेय

परमेश्वरा तूच यातून सोडव 


टाळतेय इतरांचा हस्तस्पर्श 

उगाचच घराबाहेर ते फिरणे

नको संसर्ग धोका साऱ्यांना

विषाणूचे ते शरीरात शिरणे


जगावरच कोसळले संकट

प्रयत्न माझाही राष्ट्रासाठी 

घरातच हल्ली बसून राहते

ना संपर्क संसर्गाच्या पाठी


उडालीय भीतीने सारी दैना

वापरते घरी मी सॅनीटायझर

हात-पाय नि सारे घर स्वच्छ 

राखतेय प्रदूषणमुक्त परिसर


शिंकताना झाकते तोंड नाक

नको इतरांना विषाणूचा त्रास

हळद दूध पिऊन जेवण ताजे

खाऊन घेतेय मी सुखाचा घास


बाहेर जाताना लावते  मास्क

गर्दीत जाणेही पूर्णत:  टाळते

घर माझे ठेवते मी जंतुविरहित

कापूर धूप घरांदारांतुन जाळते 


कोपू नयेच हा कोरोना विषाणू

म्हणूनी राहूया सारेजण बंदिस्त 

सुरळीत होता सारी जीवनक्रिया

खाऊ फिरू राहूया खुशीत मस्त


ठेवूया संयम मनावर आपल्या

वेळ आलीय आता कसोटीची

मरून जाऊ दे हा विषाणू पार 

नको खरेदी औषधे बनावटीची


સામગ્રીને રેટ આપો
લોગિન