विषय: आईविना मी कसे जगावे?
विषय: आईविना मी कसे जगावे?


नयनातील आसवांना
भावनांचा पूर यावा|
एक एक अश्रू माझा
सिंधूतील थेंब व्हावा||१
आई तुझा ध्यास
सारखा मनास|
भेट तुझी होता
अर्थ जीवनास||२
आई तुझी कूस
सोन्याची मूस|
आकाराला येई
बालक गोंडस||३
आई तुझी माया
जणू वृक्ष छाया|
संपता संपेना
लागे नभी भिडाया||४
दु:ख येवो, सुख राहो
आस नसे कुणाची|
सोबतीला हवी साथ
माझिया जननीची||५
आई तुझे नाव
ओठांवर यावं|
गाता आनंदे
विश्वात रंगावं||६
आई तुझे बोल
वाटती अमोल|
कोरुनी ठेवावे
हृदयात खोल||७
माझ्यातील भक्ती
न कळे गं तुजला|
औक्ष लाभो तुला
मागणे परमेश्वराला||८
परी गीत ओठी
नित्य ते असावे|
आई तुझ्या विना
मी कसे जगावे||९