Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Dipali patil

Others

2  

Dipali patil

Others

विष्णू अवतार

विष्णू अवतार

1 min
239


प्रथम वंदन मस्त्यवतारा

धारण करण्या हेतू निराळा

जलमय पसारा वाचवाया

रूप पुण्य पावन आगळा


द्वितीय वंदन कूर्मावतारा

मंथन सागराचे करावया

मंदार पर्वताचा रवी करुनिया

रूप कासवाचे धरूनिया


तृतीय वंदन वराहवतारा

हिरण्यकाने केली कमाल

बुडवाया पृथ्वी जळतळाशी

त्याशी उद्धरिने वधल


चवथे वंदन नृसिह अवतारा

मिश्र रूपे नर व सिहाचे

हिरण्यकश्यपाचा केला वध

वाचले प्राण भक्त प्रलादाचे


पाचवे वंदन वामन अवतारा

ब्राह्मणरुपी अवनी अवतरला

दाणी तो बळी राजा महान

विष्णूच वामन बनले स्वर्ग वाचवायला


सहावे वंदन परशुरामाला

अमरत्वाचे वरदान त्याला

जमदाग्नि रेणुका पुत्र तो

निघाला शोधण्या कोऱ्या भूमीला


सातवे वंदन सीतारामाला

त्रेतायुगी सतपुरुष महान

कौसलेचा पुत्र गुणवान

राजा पुरुषोत्तम भगवान


आठवे वंदन मनमोहनाला

भुलवी तोडी भवपाश जगताचे

राधिकेचा सखा सोबती

देऊन गेला दान भागवतगीतेचे


वंदन करते कर जोडुनी

कोणी माने बालरामाला

तर कोणी बुद्धाला, विठ्ठलाला

सदैव नमन बालाजीला


दहावे वंदन कल्की अवतारा

कल्की भविष्य हे कलियुगाचे

लेखा जोखा लागणार सगळा

मोक्ष मान मिळवेल ब्रम्हपदाचे


Rate this content
Log in