विस्कळलेली अवस्था
विस्कळलेली अवस्था
माणसा माणसात वैर माजतो|
लालसे पोटी का गैर वागतो||
आज तुझ्या मुळे अवस्था बिघडली|
शेंबडं पोरगं सुध्दा आज झगडलं|
सगळं काही विचार मनानं तु जाणं...
विस्कळलेली अवस्था झाली का म्हणून?...(१)
देशाच हित जपणार स्वप्न होतं |
पण मानसिकतेने वेगळंच काही होत जातं||
इमानदारीने जगण्याची खोटी शपथ घेतो|
गदार होऊन भिक का सांगतो||
हि साचलेली दुर्गंधीची घान का होते ते जाणं...
विस्कळलेली अवस्था झाली का म्हणून?...(२)
पर स्त्री हि असते माते समान|
आज पहातो तर तिचा अपमान||
कित्येक माता भगिनी होतात बेजार|
वासनेने माजलेले कुत्रे करतात अत्याचार||
माणसा बेसारा जीवन झालंय हे थोडं जाणं...
विस्कळलेली अवस्था झाली का म्हणून?...(३)
