विश्व
विश्व
1 min
70
कवच्यातून माझ्या विश्व घडले
अजूनही तशी उपेक्षितच राहिले
हाताचा आधार देत सांभाळले
मायेच्या हळव्या भावनेत चालले
वेळ येताच पंख पसरले
दुःखाचे डोंगर पंखात झेलले
चक्राचा केंद्रबिंदू मीच झाले
चक्राच्या कडांनी मलाच पकडले
कहाणी सगळी केव्हाच संपली
मी नाही हार मानली
हे सारे संकट नसून
संधी म्हणून मी पाहिली
