विश्व वंदनीय राजे
विश्व वंदनीय राजे
माझ्या शिवबा राजाचं काळीज वाघाचं
लक्ष वेधलं त्यांनी सार्या जगाचं॥धृ॥
विश्व वंदिता होई शहाजी-जिजाऊंचा पुत्र
रयतेचे स्वराज्य स्वःकर्तृत्वानं स्थापिलं
स्वराज्य हे आपलं अथांग विस्तारलं
रयतेचं राज्य कल्याणकारी बनविलं॥१॥
घोड्यावरी स्वार हाती भवानी तलवार
डोंगर-दर्यात जावळीच्या खोर्यात
प्रतापगडाच्या पायथ्याला लढीले चातुर्यानं
अफजलखानाला वाघनख्यानं फाडीलं ॥२॥
संगतीला होते मुठभर मावळं
कणखर आरमार निधड्या छातीनं
वार्यासारखे हो येई शत्रुस नमवून
गनिमी कावा हे युद्धतंत्र वापरलं॥३॥
स्वराज्यासाठी राजं आयुष्यभर झुंजलं
आपले हो राजे छत्रपती झालं
व्यवस्थापन सुंदर होई विश्वभर विजय
आदर्श राजांना मुजरा केला जगानं॥४॥
