विसावा ............
विसावा ............

1 min

126
शब्द कोंडले हृदयातच मी
भावनेचा गळा दाबला
डोक्यांमधले वैचारिक किडे
सर्वांना मी विष पाजला
उपेक्षा व्हावी पुढे जाउनी
अपेक्षा असल्या ठार मारल्या
आपुलकीचा ठाव सांगती
पुस्तकही त्या पार जाळल्या
इकडे तिकडे मृत पडलेले
स्वप्नांना माती पुरवून आलो
फसव्या पर्यायी वचनांना
पद्धतशीर मी बडवून आलो
विश्वासाची दोर करपली
माणुसकीचा भ्रमित दिखावा
दार मनाचे बंद करूनी
एकांती घेतो गोड विसावा
एकांती घेतो गोड विसावा