विरूद्ध अर्थी शब्दकाव्य
विरूद्ध अर्थी शब्दकाव्य

1 min

3.1K
आला आला पाऊस
ओलेचिंब होऊया
भिजून झाल्यावर
सुके कपडे घालूया.....
पावसात मुलांनो
छोटी नाव सोडूया
सागर किनारी जाऊन
मोठी होडी पाहूया....
भराभर धावती मुले
पावसात मजा करती
हळूहळू मुले मग
पाण्यात उड्या मारती....
पावसाच्या सरी
थंड थंड वारा
गरम भजी सोबत
लटका आईचा पारा....