विराणी
विराणी
1 min
342
जीवनी नसता तू
होई उदासगाणे
जळीस्थळी गमे मला
जगणे हे विराणे
कसे भरावे कळेना तूजविण
जीवनाचे हे पुस्तक
दूर गेलास तु जरी
आठवणी देतात दस्तक
नकोच तुझ्याविना माझ्या
कोवळया भावनेचा पसारा
उदासीन गमते जग अन
तुझ्या मनातील निवारा
रोकलेल्या जीवनशलाका
पदोपदी जाणवतात
तुझ्या जाण्याचे दुःख
तुझ्या आठवणी पालवतात
