विपर्यास
विपर्यास
1 min
252
अंत साऱ्या वेदनांचा
सोबतीला फास आहे।
ढाळताना आसवांना
मीच माझा खास आहे।।१।।
पंगतीला जेवताना
खोकण्याचा त्रास आहे।
चावलेले पचताना
कोंडलेला श्वास आहे।।२।।
संगतीला ढोकळ्याचा
बेत माझा खास आहे।
सांगताना आज माझा
आठवांचा भास आहे।।३।।
