STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

विमान

विमान

1 min
264

भिरभिरत्या सुंदर फुलपाखरा

ये ना रे माझ्या अंगणाच्या दारा....


जाई, जुई, गुलाब, मोगरा दारात

सुरेख सुवास पसरतो माझ्या घरात......


वृक्षवेली, फुलं आहेत माझ्या परसात

मध शोषण्या ये फुलपाखरा अंगणात.....


फुलाफुलांचे रंगीबेरंगी छान आहेत रंग

फुलपाखरा फारच नाजूक तुझे अंग....


 मध शोषण्यात गुंग झालेय फुलपाखरू

मुलं त्याला शोधतात मी त्यांना कसे आवरू....


उडतं फुलपाखरू विमान जसे भासतंय

फुलाफुलातील मकरंद शोषून घेतंय.....


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍