.. विजयादशमी दसरा
.. विजयादशमी दसरा
1 min
390
पहाट झाली सण दसरा सर्वांचा करुया साजरा
आजचा तुमचा दिवस आनंदाने नेहमी हसरा
उधळण घातली नऊ दिवसांच्या अंतराने रंगाची
आराधना केली मंडपात बसलेल्या दुर्गा देवीची
रांगोळी सजली अंगणात फुले आणली झेंडूची
सजविले घर माळ बनवली झेंडूच्या फुलांची
तोरण बांधले बहरलेल्या बागेतील रंगीत फुलांचे
हिरवेगार गालिचे पान ओतले त्यात आपट्याचे
आपट्याच्या पानाला सर्वांचा मान आहे लुटायचा
दुःख सारे बाजूला करून हळूच सारे विसरण्याचा
पूजा आर्चा ध्यानीमनी भक्ती भावाने प्रार्थना केली
देवतांची पूजा करून भविष्याची स्वप्ने मनात रंगली
