विजिगिषु प्रेरणा
विजिगिषु प्रेरणा
वाट मिळेल तिकडे
चाललं होतं आयुष्य
का जगायचं ?
कसं जगायचं ?
यावर कधी झालचं नव्हतं भाष्य ........
आंबेडकरांच्या एक एक वाक्यांनी
पेटून उठायला शिकवलं
ओतप्रोत प्रेरणांनी
भरभरून जगायला शिकवलं ....
अन्यायाला प्रतिकार
तर कधी स्वतःलाच हुंकार द्यायला शिकवलं
पुस्तकाचं पान चाळताना
आयुष्य वाचायला शिकवलं ....
वाटा आपोआप मिळत जातात
फक्त चालायचं बळ मिळायला हवं
माझ्या रित्या मनाच्या पारड्यात
धैर्य नि जिज्ञासेचं झुकतं माप टाकलं ...
जगायला आणि खरंच जगवायला शिकवलं ......
विचारवंत की ते परीस सांगा
ज्यांनी आयुष्याचं सोनं करायला शिकवलं..
तेच संत
तेच विचारवंत
नि तेच ठरले साऱ्या परिवर्तनाची
विजिगिषु प्रेरणा ...........
