विडंबन रचना
विडंबन रचना
जेष्ठ कवयित्री बहिनाबाई चौथरी यांची माफी मागुन त्यांची कवीता अरे संसार संसार यावर विडंबन कवीता
अरे नशीब नशीब,जसा सट्टा बाजारात
होते मनी चुट्पुट,आशा हावरी मनात ।
अरे नशीब नशीब,खरं खोटं करू नये
कष्ट करतांना गड्या,मागे कधी हटू नये।
अरे नशीब नशीब,आहे हसनं रडनं
त्याला आजमावतांना,जाऊ नको रे खचून ।
अरे नशीब नशीब,कर प्रयत्न कामाचा
त्याच प्रयत्नात तुला ,मार्ग मिळेल यशाचा ।
तुझ नशीब नशीब, कसा स्वताचा उद्धार
हवे सुख समाधान,देतो दुखाला नकार
अरे नशीब नशीब,खेळ आहे भयानक
समजला तर जीत,नाही तर रे नाहक।
अरे नशीब नशीब,आधी स्वताचा विचार
झाले विपरीत काही,घेतो मृत्यूचा आधार।
