विचारी ठेवा पाण्याचा...
विचारी ठेवा पाण्याचा...
1 min
138
हमी निरोगी संपन्न आरोग्याची
देई स्वच्छ शुद्ध पाणी जीवनी
वापर पाण्याचा सावधानतेचा
राखी शाश्वत विकास भविष्याचा
पाणी जीवनदान प्रत्येक जीवाचे
जतन व्हावे सर्वश्रेष्ठ ठेव्याचे
थांबेल वणवण जीवाची तेव्हा
होईल पाण्याची शाश्वती जेव्हा
दुष्काळाचा वणवा भटका पेटतो
पाण्याविना कासावीस जीव होतो
गरज काळाची ओळखून व्हावा
विचार नव्या पिढीने ओळखावा
