वेळेचे कण कण।
वेळेचे कण कण।
1 min
210
वेळेचे कण कण।
वेळेचे कण कण।
निसटतात हातून क्षण क्षण।
त्यास कुणाची चौकट मान्य नाही।
समयावर कुणाची पाहणी नाही।
काळ चालला वाहून।
जसे मुठीतून वाळूचे कण।
सांगे काही शहाणपण।
ऐकून घे कान उघडून।
मी न कधी थांबलो आहे।
मी न कधी थकलो आहे।
जगून घे आयुष्य हे पुर्ण तुझे।
परत हे भेटने अवघड आहे।
रुपयाच्या ढेरावर मी सापडत नाही।
रुपयाच्या ढेरापुढ मी थांबत नाही।
माझे काही मोल नाही।
कारण मी अनमोल आहे।
