वेळ
वेळ
1 min
301
निसटते हातातून वाळूचे कण
निसटते हातातून आपली वेळ साधून
ही वेळच असते अशी
तिने काय दिले आपल्याला
विचार असा कर की
आपण काय दिले तिला
वेळ आपल्याला देत नाही
ती फक्त संधी देते
पण त्या संधीचा आपण काय करतो
ती फक्त आपल्या हातात असते
वेळ आपल्यासाठी खूप काही असते
कधी सुख आणते
सोबत दुःखही आणते
मनातली विचारांची घाण
ती आपल्या सोबत घेऊन जाते
वेळ ही अशी असते
दुखाचे चटके पण ती देते
तसेच सुखाचा ओलावा पण ती देते
अस्तित्व संपलं तरी पण वेळ ही उरतेच
