वेगळी जात
वेगळी जात
1 min
232
सरड्यांसारखे रंग बदलताना पाहिले त्यांना
मतलबासाठी मधाळ बोलताना पाहिले त्यांना
ना मैत्री ना दुष्मनी करावी अशांशी कधीही इथे
बेभरवशी अगदी दूर होताना पाहिले त्यांना
ना उपयोगाचे होते वेळेत ना कधी धावलेले
ओठात एक पाठी एक निंदताना पाहिले त्यांना
निष्ठेच्या गप्पा मोठमोठ्या सत्तेसाठी हपापलेले
शपथ परि वेगळेच वागताना पाहिले त्यांना
दलबदलूंचे तात्विक मुलामे कल्हई केलेले
विश्वासार्हता हरविलेले थिटे पाहिले त्यांना
