STORYMIRROR

swati Balurkar " sakhi "

Others

4  

swati Balurkar " sakhi "

Others

वेदना आणि भावना

वेदना आणि भावना

1 min
613

वेदना झेलणाराला जाणवते

वेदना वाहणार्‍या काळजाची!

शब्दांचा तो नसतो भूकेला

ओढ त्याला हळव्या भावनांची!

तुझ्याकडून नव्हत्याच त्या अपेक्षा

तू शब्दांचा धनाढ्य व्यापारी. .

कानांवरचा विश्वास सोडून

डोळ्यात वाच ना तडफड सारी!

वेदनेला व्यक्त होण्यास

शब्दांची आवश्यकता नव्हतीच ,

भावनांचा अर्थ शोधणार्‍याला

वेदना समजलीच नव्हती!

शब्द रुसले अन तू अंतर्धान आयुष्यातून. .

मी सावरले स्वतःला अन् पाहिले नाही वळून !


Rate this content
Log in