वेड्या बहिणीची माया
वेड्या बहिणीची माया
1 min
8
मातृतुल्य दुसरी
आहे बहीण
जाणावी मातृत्व
काय आहे बंधन
वंदन माझ्या
बहिणीला करि
सर्वांचा सांभाळा
आठवे गेल्या सासरी
दोन घरची लाज
राखणे तिला
जमते सर्वांचे
मने जपण्याला
आता कौतुक
आई सम करते
तिच्या आधाराने
सर्वांना आवडते
आवडी निवडी
जपते सर्वांच्या
उदार अंतःकरण
उमेद जगण्याच्या
वेड्या बहिणीची
वेडी ही माया
सर्वांच करून
झिजवते काया
