STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

वेढावतो मनाला

वेढावतो मनाला

1 min
156

वेढावतो मनाला वारा क्षणाक्षणाला,

नसतो तेव्हा थारा क्षणाक्षणाला, 


प्रेमात पावसाचा असतो कुठे भरवसा,

पडतात त्यात काही गारा क्षणाक्षणाला,


स्वातंत्र्य गाण जर का ओठावर तुझ्या तर,

का बांधतात मग तू कारा क्षणाक्षणाला,


का आरशासमोर भासे चर्चा अनोळखीसी,

उडतो अता आताशा पारा क्षणाक्षणाला,


समजून घेतली मी आताच लोकशाही,

खातात लोक तेही चारा क्षणाक्षणाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन