STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

वेडे मन हे तुझ्यात गुंतले

वेडे मन हे तुझ्यात गुंतले

1 min
195

आज जरा निवांत होते

आयुष्याचे पान जरा चाळत बसले

पाने हळूच उलटून पाहताना

आठवणींच्या झुल्यावर मी झुलले....


या पानांवर खूप काही लिहिलेले

अमाप चित्रे जीवनी रेखाटलेली

जीवन पन्नाशीचे हो आता

गत स्मृतीत मनी उतरलेली.....


स्मृतीपटलावर जरा विसावले

गतकालीन विश्वात जरा रमले

थोडी मी त्यात हरवूनच गेले

सुखदुःखाचा हिशोब लावत बसले....


शब्द काही सापडले नाहित हो

जीवनी सुख अमाप मिळालेय

पण दुःखतूनही व्यवस्थित तरलेय

गुरूकृपेने मी त्यातून बाहेर पडलेय.....


वेड्या मन हे तुझ्यात गुंतले आता

गतकालात झाले ते होवून गेले

आता वर्तमानातील बहारदार दिवसात

मनसोक्त जगायचे जे जगायचे राहिले.....


दुःखाला सामोरी तर जात आहेच

आता सुखाला जरा कुरवळायचे

काही लोकांसाठी Who care म्हणून

आपण आपले उर्वरीत आयुष्य जगायचे....


ओलावले नयन माझे गतकाली जाताना

सुखावतील नयन भविष्य निरीक्षण करताना

कविता चारोळींचे लेखन करायचे 

राहून गेलेले जगायचे ते रेखाटायचे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन