वेड प्रेमाचे
वेड प्रेमाचे
तुझी माझी प्रीत अशी
दुनियेची ही रीत कशी
सांगू कसे मी दुःख कुणा
वेड लावते पुन्हा पुन्हा
झुळझुळणाऱ्या ओढ्याला
ध्यास भेटण्या नदीचे
भिंती बघून थकले मी
डोळ्यात खेळतो तू पुन्हा पुन्हा
सजने धजने नको मला
आरशानेही धरला अबोला
मिठीत येण्या आतुरले मी
चेहरा बघून पुन्हा पुन्हा
दूर सारण्या केले प्रयत्न
बंध प्रीतीचे तूटतील कसे
कवेत घेतले मृत्युने जरी मजला
जन्म घेईल मी पुन्हा पुन्हा