टोपल
टोपल
पहाटे प्रारंभी हाक कानी
लाख्या ढवऱ्याची पडली
हंबरत ती वासरास
पान्हा मायेने सोडली
जागा झाला आता गोठा
किलबिल पाखरानी केल
गोठयातल्या शेणवळास
साद घाली काम्बीच टोपल
माय माऊलीची लगबग
डोई शिदोरीच टोपल
कराय
ा कष्ट शिवारात
तुळवी पायी ती ढेपल
आग ओकी सूर्य नारायण
अंगी निथळ घामाचे लोट
एक वाऱ्याची झुळक
मना आनदं देई अफाट
विजांचा कडकडाट फार
भुईवरी पाणी पडे संततधार
घराच्या दिशेने चाले पावल
डोई पुन्हा घेई आनंदाने ती टोपल