ओढ पावसाची
ओढ पावसाची
1 min
58
निसर्गाचे आगमन होतेय
थयथय विज नृत्य करतेय
स्वागतास तगमग वसुुंधरेची
गडगडत ढगही ताल धरतेय
अत्तरही फिके पडावे
सुगंध चढतोय असा मातीला
अंधारलेल्या झोपडित माझ्या
दिव्याची साथ आहे वातीला
डोक झाकायचा निवारा
बदाबदा गळते
आडोश्याला उभ राहत
नजर आभाळाकडे वळते
आभाळ दाटलय भारी
किमया दिसतेय निसर्गाची
कास्तकार माझ्या माय बापाला
लागली ओढ पावसाची
