नातं
नातं
1 min
56
नातं बहिन भावाच
नसते फक्त रेशीमगाठ
प्रेम अन जिव्हाळ्याने
मिळते रे जीवनभर साथ
बालपनीची पहिली मैत्रीण
असते आपली बहिन
खोडया मस्कऱ्या करत
गीत नवे मी गाईन
मिळाले जरी एक बिस्किट
आठवण भावाची करायची
एकामधले दोन करत
भावासाठी राखून ठेवायची
भांडण करायची खेळतांना
चिडवून ती रडवायची
मिळता दम बाबांचा
अंगा खांद्यावर खेळवायची
स्वर्गाहुनही सुंदर
नाते बहिन भावाचे
मिळून करूया रक्षण
समाजातील बहिनींच