STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

3  

Neha Ranalkar(Nawate)

Others

वडील माझे शेतकरी

वडील माझे शेतकरी

1 min
315

वडील माझे शेतकरी


वडील आहेत माझे शेतकरी

दिवसभर जे राबतात शेतात!

मिळालीच कधी कांदा भाकर

तरच सोबत खायला घेतात!!१

नांगरणी,वखरणी,पेरणी, कामे

वेळच्या वेळीच ते करतात!

उभं पीक जळून गेल्यावर मात्र

स्वत:लाच जबाबदार धरतात!! २

अतिवृष्टी,अनावृष्टी त्यांच्या जणू

पाचवीलाच असे का पुजलेली!

कष्टाशिवाय नशीबी भाकर नाही

तिक हाडामांसात रुजलेली!! ३

अती श्रमाने बा पार दमून भागून

सांजयेळेलाच घरी येत असतो!

आमच्या शैक्षणिक प्रगतीचा पत्त्याच त्याला लागत नसतो!! ४

पोटापाण्याची मात्र आमच्या

चिंता त्याला लागून असते!

स्वत:च्या आरोग्याची त्यापुढे

फिकीरच मुळी त्याला नसते!! ५

अशा शेतकरी वडीलांचाच

मी ही खरा वारसदार आहे!

त्यांच्या सुखसुविधांसाठी मी 

शिक्षणात प्रगती पथावर आहे!! ६



Rate this content
Log in